सेल्फी हजेरीला शिक्षकांचा विरोध कायम

January 10, 2017 9:03 PM0 commentsViews:

दिनेश केळुसकर, रत्नागिरी
10 जानेवारी : शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या हजेरीसाठी पुन्हा एकदा दर दहा विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनी एक सेल्फी काढून अपलोड करण्याचे आदेश शिक्षण विभागाने काढले आहेत. याला राज्यभरातल्या संघटना आणि शिक्षकांकडून तीव्र विरोध होतोय. यासाठी येत्या 21 जानेवारीला शिक्षक संघटनांकडून राज्यभरात आंदोलन करण्यात येणार आहे.

selfie with guruj

पहिलीच्या वर्गाला शिकवणाऱ्या या सावंतबाईंची तारांबळ उडालीय. एकतर दहा विद्यार्थी त्यांच्या मोबाईलमध्ये सेल्फीसाठी मावत नाहीयेत आणि विद्यार्थ्यांना घ्यायचं म्हटलं  तर त्या स्वत: त्यात दिसत नाहीयेत. तीच गोष्ट दुसरीला शिकवणाऱ्या या शिक्षिकेची… बरं, शिक्षण विभागाच्या आदेशानुसार सेल्फी काढून ते अपलोड करण्यासाठीची यंत्रणा ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये तर बिलकूल नाहीत. म्हणून ही विद्यार्थ्यांची काही काळ मज्जा असली तरी शिक्षकांना मात्र सजा आहे .

शिक्षकांच्या म्हणण्यानुसार हजेरीबाबतचे सर्व ऑनलाईन रेकॉर्ड सरलच्या माध्यमातून शिक्षण विभागाकडे जात आहेत. त्यामुळे पोषण आहाराच्या नियोजनासारखं आधीच ऑनलाईन काम असताना आणखी हे एक शाळाबाह्य काम आणि ते ही शिक्षकांच्या स्वत:च्या खर्चातून करण्यास शिक्षक संघटनांनी तीव्र विरोध केलाय.

सेल्फी पाठवण्याचे जे आदेश आहेत ते पहिली ते बारावीच्या विद्यर्थ्यापर्यत आहेत रत्नागिरीच्याच विचार केला तर रत्नागिरीत पहिली ते बारावीचे सहा लाख पन्नास हजार विद्यार्थि आहेत म्हणजे रोज पासष्ट हजार फोटो. अपलोड करावे लागतील.

राज्यातल्या अनेक दुर्गम भागात अद्यापही मोबाईलचं नेटवर्क नाही. अनेक शाळात संगणकही नाहीत. शिवाय दळणवळणाच्याही गंभीर समस्या आहेत. अशा परिस्थितीत पेपरलेस होण्यासाठी शिक्षण विभागाने लढवलेली अजब शक्कल शिक्षकांना आर्थिक भूर्दंडही देणार असल्यामुळे पुन्हा एकदा शिक्षकांच्या एकमुखी विरोधाचं कारण बनलीय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close