विद्रोहासाठी तीन वर्ष जेल तरी आवाज बुलंद!

January 10, 2017 9:32 PM0 commentsViews:

वैभव सोनवणे, पुणे  

10 जानेवारी :  नक्षलवादाशी संबंध असल्याच्या आरोपामुळे तीन वर्ष आठ महिने तुरुंगात राहिल्यानंतर कबीर कला मंचचे सागर गोरखे, रमेश गायचोर आणि सचिन माळी यांची सर्वोच्च न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे. मात्र गेल्या साडेतीन वर्षात तुरुंगात ही या शाहिरांनी त्यांचा विद्रोह सुरूच ठेवला शंभरच्या वर गाणी लिहिली कित्येक कविता लिहिल्यात आणि आता नव्याने हा जलसा विद्रोहाची भूमिका मांडणार आहे.

Kabir kala manch121

तुरुंगातली ही परिस्थिती हुबेहूब डोळ्यासमोर उभे करणारे हे शाहीरही कैदी होते. दोनच दिवसांपूर्वी तळोजा कारागृहातून त्यांची जामिनावर सुटका झालीय. २०१३ पासून आजवर कबीर कला मंचचे हे कलाकार नक्षलवादाशी संबंध असल्याच्या आरोपाखाली तुरुंगात होते. अखेर सर्वोच्च न्यायालयापर्यंतच्या संघर्षातून या तिघांची सुटका झालीय.

सरकार विरोधी भूमिका घेतली म्हणून देशविरोधात कृती केल्याचा गंभीर गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात टाकलं. साडेतीन वर्षांच्या तुरुंगातल्या संघर्षामधून त्यांनी हा पोवाडा लिहिल आहे.

सरकार आणि कबीर कलामंच मधला हा संवैधानिक संघर्ष आता निर्णायक टप्प्यात आहे तरीही विद्रोह जागवणाऱ्या गाण्यांनीच तुरुंगातही या कलाकारांना चांगली प्रतिमा उभी करायला मदत केली.

या सगळ्या कायदेशीर प्रक्रियेत सत्य असत्य काय ते उघड होईलच या कलाकारांनी खरंच काही देशविघातक केलंय ,नक्षलवाद्यांशी संबंध ठेवले होते का हेही उघड होईल. मात्र तोवर तरी डफाच्या तालावर या कबीरला नाचू द्या अशी मागणी हे तरुण करत आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close