नोटाबंदीनंतर जमा झालेले 3 ते 4 लाख कोटी बेहिशेबी?

January 10, 2017 10:02 PM0 commentsViews:

10 जानेवारी : नोटाबंदीनंतर देशभरातल्या बँकांमध्ये जमा झालेल्या पैशांपैकी अंदाजे 3 ते 4 लाख कोटी रुपये हा काळा पैसा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आयकर विभागाच्या सूत्रांनीच ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे तब्बल 60 लाखांहून बँक खात्यांवर प्रत्येकी 2 लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा झाली आहे. या सगळ्या खात्यांची आता आयकर विभागामार्फत चौकशी केली जाणार आहे.

money_AP

नोटबंदी होऊन आता दोन महिने लोटले आहेत. बाद झालेल्या चलनापैकी जवळपास 90 टक्के पैसा पुन्हा बँकेतही जमा झाला आहे. पण तरीही सरकारकडून काळ्यापैशांबाबत कोणतीच अधिकृत आकडेवारी जाहीर झालेली नाही. पण बँकांमध्ये जमा झालेल्या काही रकमांवर आयकर विभागाकडून आतापासूनच बारीक नजर ठेवली जातेय, कारण यातले काही बँक व्यवहार संशयास्पद आढळून आलेत. म्हणूनच आता आपण नोटबंदीनंतर बँकेत जमा झालेल्या आकडेवारीचा नव्याने धांडोळा घेऊयात…

नोटबंदीनंतरची आकडेवारी

  • नोटबंदीमुळे 15.44 लाख कोटींचं चलन बाद
  • यापैकी 14 लाख कोटी पुन्हा बँकेत जमा
  • बाद चलनापैकी 95-97 टक्के रक्कम बँकेत परत

आता आपण हे 14 लाख कोटी बँकांमधे नेमके कोणकोणत्या मार्गाने जमा झालेत ते देखील पाहुयात…

असा जमा झाला काळा पैसा ?

  • तब्बल 60 लाख खात्यांवर प्रत्येकी 2 लाखांहून अधिक रक्कम जमा
  • या मार्गानं बँकांमध्ये तब्बल 10,700 कोटी जमा
  • यापैकी 25 हजार कोटी हे निष्क्रिय खात्यांवर जमा
  • तर कर्जफेडीच्या रूपानं 80 हजार कोटींची रोकड जमा
  • एकसारखे पॅनकार्ड असलेली रक्कम 42,000 कोटी
  • ईशान्येकडील बँक खात्यांमध्ये 10 हजार 700 कोटी जमा

विविध बँकांमध्ये जमा झालेल्या या रकमांपैकी काही खात्यांचे पॅन कार्ड क्रमांक देखील चक्क एकसारखेच निघालेत आणि ही रक्कम तब्बल 42हजार कोटींच्या घरात आहे. तर निष्क्रिय खात्यांवर जमा झालेली रक्कम ही 25 हजार कोटींच्या घरात आहे. आता तुम्ही म्हणाल ही निष्क्रिय खाती म्हणजे काय भानगड आहे तर ते म्हणजे ज्या खात्यांवर यापूर्वी कोणतेच मोठे व्यवहार झाले नव्हते. म्हणूनच कदाजित नोटबंदीनंतर काळापैसा ह्या अशा आड मार्गाने तर बँकामध्ये जमा झाला नाही ना, या शंकेला बराच वाव आहे. म्हणूनच आयकर विभागाने अशा सर्व संशयास्पद व्यवहारांची चौकशी करण्याचे आदेश दिलेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close