विमान अपघातात 158 ठार

May 22, 2010 9:44 AM0 commentsViews: 11

22 मे

मंगलोरमध्ये आज लँडिंग करणार्‍या विमानाला भीषण अपघात झाला. यात विमानातील 158 जणांचा मृत्यू झाला. यात 23 लहान मुले तर 6 क्रू मेंबर्सचा समावेश आहे. तर यातून 8 जण आश्चर्यकारकरित्या बचावले.

दुबईहून मंगलोरला येणार्‍या विमानाला सकाळी साडेसहाला हा अपघात झाला.

एअर इंडियाने पत्रकार परिषदेत या अपघाताबद्दल माहिती दिली. रनवेवरून हे विमान थेट दरीत कोसळले आणि त्यानंतर विमानाने पेट घेतला. त्यावेळी विमानात 166 जण होते.

विमानाचे को-पायलट अहलुवालिया यांच्यासह विमानातील 6 कर्मचार्‍यांचाही मृत्यू झाला. विमानाचे मुख्य पायलट रशियन होते. अहलुवालिया मुंबईचे होते.

दिल्ली विमानतळावर या संदर्भात माहिती देण्यासाठी -011-2560-3101 आणि 011-2565-6196 हेल्पलाईन सुरू करण्यात आल्या आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आणि हवाई वाहतुकमंत्री प्रफुल्ल पटेल मंगलोरमध्ये दाखल झालेत.

दरम्यान, पंतप्रधान निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींना 50 हजारांची मदत दिली जाणार आहे.

अपघातात बचावलेल्या 8 प्रवाशांपैकी 7 जणांची ओळख पटली आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे…

पुट्टुरिस्माईल अब्दुल्ला

जोएल प्रताप डिसोझा

जी. के. प्रदीप, कृष्णन कुलीक्कुन्नू

मयंकुट्टी के. पी.

उमर फारुक मोहम्मद

सबरीना नसरीन्हक

एअरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडियाने यासंदर्भात कन्ट्रोल रूम सुरू केल्यात. त्यांचे नंबर पुढीलप्रमाणे…

1. चेन्नई 044-2256 1365/ 2256 0894

2. मंगलोर -0824-2220422

3. दिल्ली – 011-2461 0848/2461 08 43

या दुर्घटनेविषयी काही शंका आता उपस्थित केल्या जात आहेत….

धावपट्टीच्या टचडाऊन पॉइंटपासून पायलट तब्बल 2000 फूट पुढे का गेला ?

धावपट्टीच्या आजुबाजूचा सेफ्टी एरिया 120 मीटर्स असावा असा नियम आहे….मंगलोर विमानतळाला फक्त 90 मीटर्सचा सेफ्टी एरिया आहे…

हवामान सामान्य होते…मग हा अपघात कशामुळे झाला?

धावपट्टी निसरडी होती का?

मंगलोर दुर्घटनेनंतर एअर इंडियाने मंगलोर एअरपट्टीसंदर्भात, तिथल्या हवामानासंदर्भात माहिती दिलीय.

हवामान -

व्हिजिबिलिटी – 6 किलो. वारा – सामान्यघटनेच्या वेळी पाऊस पडत नव्हता

इतर माहिती –

एअरपोर्टवर लँडिंगच्या वेळी विमानाला रनवेवरची माहिती देण्यासाठी वापरली जाणारी इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम म्हणजेच आयएलएस यावेळीही व्यवस्थित कार्यरत होती. 24 क्रमांकाच्या रनवेवर लँडिंग होताना पायलट एअर ट्रॅफिक कन्ट्रोलरशी संपर्कात होता.

रनवेवरच्या टच डाऊन पॉईंटपासून 10 मैलावर आयएलएसशी संपर्क झाला होता. टच डाऊन पॉईंटपासून 4 मैल अंतरावर त्याला लँडिंगसाठी क्लिअरन्स देण्यात आला. टच डाऊन झोनच्या थोडे पुढे जाऊन विमान रनवेवर उतरले त्यानंतर ते रनवे सोडून पुढे गेले आणि थेट रनवेच्या पुढे असलेल्या दरीत कोसळले. तसेच, पायलटकडून कोणत्याही समस्येबाबत कळवण्यात आले नाही.

close