आज महापालिका निवडणुकांची घोषणा

January 11, 2017 10:39 AM0 commentsViews:

VOTING WEB copy

11 जानेवारी : महापालिका निवडणुकींची आज घोषणा होणार आहे.आज सायंकाळी 4च्या सुमारास पत्रकार परिषद होणार आहे.

राज्यात होणाऱ्या 10महानगरपालिकांच्या निवडणुका या फेब्रुवारी महिन्यातच होणार आहेत.जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुका मुदत संपण्यापूर्वी  घेणं आवश्यक आहे. महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना त्या संबंधी सूचना देण्यात आल्या आहेत.

मुंबईसह ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, सोलापूर, नागपूर, अमरावती आणि अकोला या महापालिकांची मुदत मार्चमध्ये, तर उल्हासनगर आणि चंद्रपूर या महापालिकांची मुदत एप्रिलमध्ये संपत आहे.

१० महापालिका

 १) मुंबई २) पुणे ३) पिंपरी चिंचवड ४) ठाणे ५) उल्हासनगर ६) नाशिक ७) नागपूर ८) अकोला ९) अमरावती १०) सोलापूर
२६ जिल्हा परिषदा
१) रायगड २) रत्नागिरी ३) सिंधुदुर्ग ४) पुणे ५) सातारा ६) सांगली ७) सोलापूर  ८) कोल्हापूर ९) नाशिक १०) जळगाव
११) अहमदनगर १२) अमरावती १३) बुलढाणा १४) यवतमाळ १५) औरंगाबाद १६) जालना १७) परभणी १८) हिंगोली
१९) बीड २०) नांदेड २१) उस्मानाबाद २२) लातूर २३) नागपूर २४) वर्धा २५) चंद्रपूर २६) गडचिरोली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close