‘सेल्फी विथ स्टुडंट’ निर्णय तूर्तास स्थगित,IBNलोकमतच्या बातमीचा दणका

January 11, 2017 12:14 PM0 commentsViews:

VINOD SELFIE WEB

11 जानेवारी: ‘सेल्फी विथ स्टुडंट’ हा निर्णय तुर्तास स्थगित केल्याचं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं. IBN लोकमतच्या बातमीचा हा दणका आहे. दुर्गम भागातल्या शिक्षकांनी सेल्फी हजेरी काढण्यातल्या अडचणी सांगितल्या होत्या. आणि त्याला नकारही दिला होता. IBN लोकमतनं शिक्षकांच्या व्यथा समोर आणल्या. IBN लोकमतच्या बातमीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय

शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या हजेरीसाठी पुन्हा एकदा दर दहा विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनी एक सेल्फी काढून अपलोड करण्याचे आदेश शिक्षण विभागाने काढले होते. याला राज्यभरातल्या संघटना आणि शिक्षकांकडून तीव्र विरोध केला होता. यासाठी येत्या 21 जानेवारीला शिक्षक संघटनांकडून राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता त्यानंतर आज तो निर्णय स्थिगत कऱण्यात आला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close