हा खेळ मिलनाचा,सापांच्या जोडीला पाहायला गर्दी

January 11, 2017 1:00 PM0 commentsViews:

11 जानेवारी : पुण्यात ज्या झेड ब्रीजवर एरवी जोडपी बसलेली असतात आणि जाणारे येणारे बघे त्यांना उत्सुकतेनं बघतात, त्याच झेड ब्रीजवर कालही बघ्यांची गर्दी झाली पण ही गर्दी वेगळ्या जोडप्याला पहाण्यासाठी जमली. ही जोडी आहे धामण जातीच्या दोन सापांची. बघणाऱ्यांमधे चर्चा रंगली ती सापांच्या मिलनाची.

हे मिलन पहाण्यासाठी बघता बघता मोठी गर्दी जमली. काही जण जवळ जाऊन बघण्याचा प्रयत्न करत होते तर काही जण दुरून. हळूहळू गर्दी वाढत गेली तशी मग दोन्ही सापांनी पळ काढला.

nag

आमचे व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटे यांनी सापांचं हे मिलन कॅमेऱ्यात कैद केलं. काही साप मित्रांचं म्हणणं असं आहे की हे मिलन नाही तर दोन साप आपआपसात मारामारी करतायत तर काहींचं म्हणणं आहे की हे मिलन आहे. महाराष्ट्राच्या काही भागात ह्याला फळण, जुळण असंही म्हटलं जातं.

सध्या टीव्हीवरही नागिनच्या मालिका फार्मात आहेत त्यामुळेच असेल कदाचित पुणेकरांनीही सापांचं हे जोडपं पहाण्यासाठी गर्दी केली असावी.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close