प्रश्न युतीचा नाही,पालिकेतल्या कारभाराचा आहे,भाजपची सावध भूमिका

January 11, 2017 1:15 PM0 commentsViews:

shelar

11 जानेवारी : महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेसोबत युती करण्याचा प्रश्न नसून प्रश्न मुंबई पालिकेतल्या कारभाराचा आहे अशी सावध भूमिका भाजपनं घेतलीय. युतीचा निर्णय तातडीनं घ्या अशी मागणी काल उद्धव ठाकरेंनी केलीय. त्यानंतर आज भाजपच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली.

ह्या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह रावसाहेब दानवे, आशिष शेलार, प्रकाश मेहता, विनोद तावडे अशी मंडळी वर्षावर हजर होती. बैठकीनंतर पत्रकारांना सामोरं जाताना आशिष शेलारांचा सेनेवर टीका करण्याचा किंवा कोंडीत पकडण्याचा तोरा कायम होता. युतीबाबत चर्चा करण्यासाठी भाजप सकारात्मक असल्याचे संकेतही शेलारांनी दिले. प्रत्यक्ष चर्चा सुरू झाल्यानंतरच कुणी किती जागा लढवायच्या याचा निर्णय होईल असं सांगायलाही शेलार विसरले नाहीत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close