मी युतीबाबत कधीच नकारात्मक नव्हतो-उद्धव ठाकरे

January 11, 2017 1:54 PM0 commentsViews:

BJP Shivsena

11 जानेवारी : महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपनं युतीचे सकारात्मक संकेत दिल्यानंतर शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपच्या प्रस्तावावर शिवसेनवा सकारात्मक असल्याचं म्हटलंय.

मी युतीबाबत कधीच नकारात्मक नव्हतो,असंही उद्धव ठाकरे म्हणाले.युतीची चर्चा करण्यासाठी दोन्ही पक्षांकडून तीन लोक असतील, असं त्यांनी स्पष्ट केलं.

काल युतीच्या निर्णयाबद्दल भाजपला अल्टिमेटम दिल्यानंतर भाजपच्या प्रतिक्रियेची उत्सुकता सगळ्यांना होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close