‘टिंग्या’ने केला गृहप्रवेश

May 22, 2010 10:17 AM0 commentsViews: 9

22 मे

'टिंग्या' फेम शरद गोयेकर याला मनसेने बांधून दिलेल्या घराचा गृहप्रवेश सोहळा आज थाटात पार पडला. शर्मिला ठाकरे तसेच मनसेचे आमदार शिशिर शिंदे यावेळी उपस्थित होते.

शरद गोयेकर या धनगर समाजातील बालकलाकाराला सन 2007 चा उत्कृष्ट बालकलाकारचा पुरस्कार जाहीर झाला. त्याचवेळी त्याच्या उघड्या घराची व्यथा 'आयबीएन-लोकमत'ने सर्वांपुढे मांडली होती.

त्यानंतर राज ठाकरे यांनी सर्वात आधी टिंग्याला दीड लाख रुपये रोख आणि 750 स्क्वेअर फुटांचे घर बांधून देण्याची घोषणा केली होती.

त्यानुसार हे टिंग्याचे नवीन घर बांधून पूर्ण झाले 'शिवाई' असे या घराचे नामकरण करण्यात आले.

close