10 महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं

January 11, 2017 4:48 PM0 commentsViews:

Banner neas
11 जानेवारी :  राज्यात होणाऱ्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका या 2 टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यात 15 जिल्हा परिषदांच्या निवडणुका तर दुसऱ्या टप्प्यात 10 जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. तर  सर्व जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांचे निकाल 23 फेबुवारीला जाहीर होणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे. सहारिया यांना दिली.

जिल्हा परिषदेच्या पहिल्या टप्पातील मतदान 16 फेब्रुवारीला, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 21 फेब्रुवारीला होणार आहे. तर 10 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी  21 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत सहारिया यांनी ही माहिती दिली.

राज्यातील 25 जिल्हा परिषदांपैकी पहिल्या टप्प्यात 15 जिल्हे आणि 162 पंचायत समितींसाठी 16 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. याचबरोबर दुसऱ्या टप्प्यात 11 जिल्हे आणि 118 पंचायत समित्यांसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होणार आहे.

10 महापालिकांसाठीही येत्या 21 फेब्रुवारीला मतदान होत आहे. या सर्व निवडणुकांचा निकाल 23 फेब्रुवारीला लागणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. आचारसंहिता आजपासून लागू झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं.

आखाडा महापालिकांचा – 10 महापालिकांचा एकाच टप्प्यात मतदान

 Mahapalika ELECTION

जिल्हा परिषद निवडणुका- 25झेडपी, 283 पंचायत समित्यांचे दोन टप्प्यात मतदान

ZP ELECTION


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close