असा असणार महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीचा कार्यक्रम

January 11, 2017 6:08 PM0 commentsViews:

890lok sabha election voting

11 जानेवारी : राज्यातल्या दहा महापालिका, 25 जिल्हा परिषदा आणि 283 पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर झालीये. दोन टप्प्यात या निवडणुका होणार आहेत. 16 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यात 15 जिल्हा परिषदांची निवडणूक होणार आहे. या मध्ये मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांचा, उत्तर महाराष्ट्रातल्या दोन अमरावती विभागातल्या दोन जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 21 फेब्रुवारीला राज्यातल्या दहा महापालिका आणि 10 जिल्हा परिषदांसाठी मतदान होणार आहे. या मतदान झालेल्या सर्व जिल्हा परिषदा आणि महापालिकांच्या मतदानाचा निकाल 23 फेब्रुवारीला लागणार आहे.

 • 4 मार्च ते 3 एप्रिल काळामध्ये दहा महानगरपालिकांची मुदत संपत आहे.
 • मार्च-एप्रिलमध्ये दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा, वेळापत्रक ठरवताना निवडणूकांचा विचार केला.
 • दहा महानगरपालिका व 25 जिल्हा परिषदांच्या निवडणूक होणार.
 • 283 पंचायत समितींच्या निवडणूक होणार.
 • 10 महानगर पालिका, 25 जिल्हा परिषदा व 283 पंचायत समितीच्या निवडणूका होणार.
 • जिल्हा परिषदांसाठी 2 टप्यात मतदान, 15 जिल्हे.
 • केंद्रीय निवडणूक आयोगाने 5 जानेवारीला मतदार यादी जारी केली, त्यानुसार निवडणुका घेतल्या जातील.
 • नागपूर सोडून 25 जिल्हा परिषदांसाठी तारखा जाहीर होणार
 • 26 जिल्हा परिषद मुदत 21 मार्च, पंचायत समिती मुदत 13 मार्च, 10 महापालिका मुदत 4 मार्च ते 3 एप्रिलला संपेल
 • 16 फेब्रुवारीला 15 जिल्ह्यातील जिल्हा परिषदांसाठी मतदान, 21 फेब्रुवारीला दुसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषदांसाठी मतदान
 • जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान 21 फेब्रुवारीला
 • 165 पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या पहिल्या टप्प्याचं मतदान 16 फेब्रुवारीला.
 • आचारसंहिता आजपासून लागू
 • महापालिकेसाठी 19 फेब्रुवारीला संध्याकाळी साडेपाच वाजता प्रचारबंदी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close