पुन्हा संघर्ष, मुंबई महापालिकेत कोण ठरणार मोठा भाऊ?

January 11, 2017 8:33 PM0 commentsViews:

11 जानेवारी :  मनपा आणि झेडपीच्या निवडणुकी जाहीर झाल्यातरी सेना-भाजप युतीच्या चर्चेचं गुऱ्हाळ संपलेलं नाही. किंबहुना हे दोन्ही पक्ष वरकरणी युती करण्याची भाषा बोलत असले तरी प्रत्यक्षात युती होईपर्यंत काहीच सांगता येणार नाही. कारण नगरपालिकेतील घवघवीत यशानंतर भाजपचा आत्मविश्वास चांगलाच वाढलाय.

uddhav-fadanavis_new

उद्धव ठाकरेंनी युतीसंबंधी अल्टिमेटम देताच भाजपने युतीची तयारी दर्शवली, एवढंच नाहीतर युतीसंदर्भात पक्षांतर्गंत बैठकही घेतली. या बैठकीनंतर भाजप युतीसाठी सकारात्मक असल्याचं आशिष शेलारांनी म्हटलंय. पण सेना नेतृत्वावर टीका करायलाही ते विसरले नाहीत.

दुसरीकडे, उद्धव ठाकरेंनी मात्र, युतीसंबंधीचा अंतिम निर्णय मी आणि मुख्यमंत्रीच मिळून घेऊ असं सांगत आहेत. झेडपीत मात्र, स्थानिक नेतेच निर्णय घेतील असं सांगायलाही ते विसरले नाहीत.

शिवसेना भाजपच्या युतीसंदर्भात अगदीच स्पष्ट बोलायचंच झालं तर मुंबईत सेनेला युती हवीय तर भाजप स्वबळावर जाऊ इच्छितंय. कारण त्यांना काहीही करून मुंबई पालिकेवर सत्ता आणायची आहे.

मुंबईत मोठा भाऊ कोण होणार? – शिवसेना की भाजप ?
सध्याचं पक्षीय बलाबल
शिवसेना- 76
भाजप- 32
भाजपची 100 जागांची मागणी

पण शिवसेना तेवढ्या जागा कदापिही सोडणार नाही. थोडक्यात काय, तर विधानसभेप्रमाणेच मुंबई पालिकेतही मोठा भाऊ कोण?, यासाठीच पुन्हा संघर्ष होणार हे निश्चित.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close