विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच मिळणार वाहन परवाना, वाहतूक मंत्र्यांची घोषणा

January 11, 2017 10:13 PM0 commentsViews:

Diwakar raote243

11 जानेवारी : परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विद्यार्थ्यांच्या वाहतूक परवान्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थांना दुचाकी आणि चारचाकी वाहतुकीचा शिकाऊ परवाना अर्थात लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स महाविद्यालयातच देण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे.

या निर्णयाची अंमलबाजवणी 16 जानेवारीपासून होणार आहे. मुंबईच्या किर्ती महाविद्यालयापासून या योजनेला सुरुवात होईल.

सरकारच्या या मोठ्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना आता आरटीओ ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठी सोय होणारे आहे.

परिवहन मंत्रालयामार्फत महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना वाहतूक परवाना देण्यासाठी यंत्रणा उभी केली जाणार आहे. त्यांच्यामार्फत शिकाऊ परवाने दिले जातील. मग विद्यार्थ्यांना ठराविक वेळ दिला जाईल. त्यानंतर आरटीओ कार्यालयात त्यांची ड्रायव्हिंग टेस्ट होईल आणि त्यानंतर आरटीओ कार्यालयात पक्का परवाना दिला जाईल.

दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरूणांना खुश करण्यासाठी शिवसेनेने हा निर्णय घेतला असण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close