राष्ट्रध्वजाचा अवमान करणाऱ्या अॅमेझॉनला सुषमा स्वराजांचा इशारा

January 11, 2017 10:49 PM0 commentsViews:

Sushma_B_25122015

11 जानेवारी :   भारतीय राष्ट्रध्वजाच्या रंगाच्या पायपुसण्या विकणाऱ्या अॅमेझॉनला परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी चांगलच फटकारल आहे. अॅमेझॉन ई कॉमर्समध्ये जगात पहिल्या क्रमांकाची कंपनी आहे. या कंपनीच्या कॅनडा ब्रँचने पायपुसण्यांवर भारताचा राष्ट्रध्वज लावून त्या विक्रीसाठी वेबसाईटवर ठेवल्या होत्या. त्यामुळे सुषमा चांगल्याच भडकल्या आणि त्यांनी या पायपुसण्यांची विक्री ताबडतोब बंद करा, नाहीतर एकाही अॅमेझॉनच्या अधिकाऱ्याला व्हिसा दिला जाणार नाही, असे स्वराज यांनी अॅमेझॉनसा बजावलं आहे.

अॅमेझॉनने तात्काळ पावले उचलली नाही तर अॅमेझॉनच्या कर्मचाऱ्यांना दिलेले व्हिसा परत घेऊ, असे स्वराज यांनी ट्विट करून सांगितलं आहे. हा आक्षेपार्ह प्रकार आहे.  स्वराज यांनी कॅनडाच्या भारतीय दूतावासाशी संपर्क साधून अॅमेझॉन कॅनडाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांपर्यत हा मुद्दा उपस्थीत करायच्या सूचना दिल्या. या वस्तू ताबडतोब मागे घ्या, या प्रकरणी बिनशर्त माफी मागा, अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाही असही स्वराज यांनी बजावलय.

अॅमेझॉन कॅनडाच्या संकेतस्थळावर राष्ट्रध्वजाच्या रंगाच्या पायपुसण्यांची विक्री होत असल्याने तेथील भारतीयांनी त्याला विरोध केला आहे. भारतीयांनी अॅमेझॉनविरोधात याचिकाही दाखल केली आहे.

.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close