बाळासाहेबांच्या स्मारकाची प्रक्रिया पुन्हा एकदा रखडली

January 12, 2017 12:15 PM0 commentsViews:

BALASAHEB SMARAK WEB copy

12 जानेवारी : बाळासाहेबांच्या स्मारकाची प्रक्रिया पन्हा एकदा रखडली आहे.आता आता निवडणुकीनंतरच जागेसंदर्भातला निर्णय होईल.महापौरनिवासाची जागा बाळासाहेबांच्या स्मारकासाठी मंजूर करावी असा प्रस्ताव महासभेसमोर न आल्यानं प्रक्रिया रखडल्याचं समजतं.

महापौर बंगल्याच्या निवासस्थानाची जागा ही स्मारकासाठी देण्याची अधिसूचना राज्य सरकारनं काढली होती मात्र हा प्रस्ताव सभागृहात महासभेत मंजूर होणं अपेक्षित होतं.पण कालच्या शेवटच्या दिवसापर्यंत प्रस्ताव महासभेसमोर न आल्यानं स्मारकाची प्रक्रिया रखडली.

आता स्मारकाबाबतची प्रक्रिया निवडणुकीनंतरच पूर्ण होईल.तर नव्या महापौरांचा गृहप्रवेशही महापौर निवासातच होणार असल्याची शक्यता आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close