अरूंद रनवेचे बळी…

May 22, 2010 2:54 PM0 commentsViews: 5

22 मे

आठवड्यापूर्वी मंगलोर विमानतळावर एक कार्यक्रम झाला होता. तेव्हा येथील पायाभूत सुविधांची चर्चा झाली होती.

60 वर्षे जुन्या मंगलोर विमानतळावर नवे टर्मिनल उभे राहिले. त्याची आठवण नेहमीच सोबत ठेवण्यासाठी सगळ्यांनी फोटोसाठी पोझही दिली. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात विमानतळाच्या भविष्यातील विकासासाठी एक महत्त्वाकांक्षी प्लॅनही जाहीर झाला.

लवकरच इथे अमेरिका आणि युरोपातूनही विमाने येऊन उतरतील, असे आश्वासन प्रफुल्ल पटेल यांनी तेव्हा दिले.

याला आठवडा झाला नाही तितक्यातच इथे 158 जणांना जीव गमवावा लागला. देशातील हा एक छोटा विमानतळ अनेक चुकीच्या गोष्टींसाठी आता मोठी बातमी बनून गेला आहे.

हा एका डोंगरावर वसलेला मंगलोर विमानतळ 1951 मध्ये बांधला गेला. या विमानतळाचा रनवे वाढवण्याची योजना अजून कागदावरच आहे. 2006 पासून इते गल्फ राष्ट्रांतून विमाने येण्यास सुरूवात झाली. दहा वर्षांपूर्वी विमानतळाची पुन्हा बांधणी केली गेली.

दरदिवशी इथून 15 हून अधिक विमानांची ये जा होते. पण अरूंद रनवे आणि पायाभूत सुविधांची कमतरता यांची नेहमीच इथे चर्चा झाली आहे. आत्तापर्यंत गेल्या पाच वर्षांत किमान इथे किमान तिनदा अपघात होता होता वाचलेत.

पण दुदैर्वाने विमानतळ प्राधिकरणाने अपघात टळावेत म्हणून गंभीर उपाययोजना केलेली नाही.

आजच्या अपघाताने पुन्हा एकदा येथील सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पण केंद्र सरकार खरोखरच यात लक्ष घालणार, की नेहमीसारखे काही दिवसांनी विसरून जाणार, हा प्रश्नच आहे.

close