मुंबई पालिका निवडणुकीसाठी एमआयएमनं फुंकलं रणशिंग

January 12, 2017 12:43 PM0 commentsViews:

vlcsnap-0629-06-27-20h44m44s764

12 जानेवारी : मुंबई पालिकेसाठी शिवसेना-भाजपात युतीसाठी अटीतटीची भाषा चालू असतानाच एमआयएमनेही रणशिंग फुंकलंय. काल निवडणुकांची घोषणा होताच रात्री मुंबईतल्या कुर्ल्यात एमआयएमचे अध्यक्ष असद्दीन ओवेसींची सभा झालीय. ह्या सभेत ओवेसींनी शिवसेना-भाजपावर सडकून टीका केलीय.

जो जवान देशाच्या सीमेवर मायनस तापमानात सेवा करतोय त्याला वेडं ठरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनो थोडीशी लाज ठेवा अशा भाषेत ओवेसींनी मोदी सरकारचे वाभाडे काढले. विशेष म्हणजे यावेळेस त्यांनी मित्रों म्हणून मोदींची खिल्ली उडवण्याचाही प्रयत्न केला आणि त्याला कार्यकर्त्यांनी प्रतिसादही घोषणांनी दिला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close