नौदलाच्या सेवेत आयएनएस खांदेरी पाणबुडी दाखल

January 12, 2017 12:42 PM0 commentsViews:

8

12 जानेवारी : भारतीय नौदलाच्या सेवेत आज आयएनएस खांदेरी ही पाणबुडी दाखल होतेय. स्काॅर्पियन वर्गातील ही पाणबुडी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या हस्ते देशाच्या सुरक्षेसाठी तैनात केली जाणार आहे.

ही पाणबुडी ६१ मीटर लांब आणि ६ मीटर रुंद आहे. तर वजन १५६५ टन आहे. समुद्रात ही पाणबुडी ६० किलोमीटर वेगाने क्षत्रूवर चाल करू शकते. भारतीय नौदलाला खोल समुद्रात सुरक्षेसाठी पाणबुड्यांची गरज आहे. तसेच शत्रूच्या क्षेत्रातील माहिती मिळवण्यासाठीही या पाणबुडीचा उपयोग होतो.

पण गेल्या काही वर्षांतील भारतीय नौदलातील वाढत्या अपघातांच्या मालिकेमुळे नौदलातील अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलाय. या संदर्भात संरक्षण राज्यमंत्री काय बोलतायेत याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close