नवे, ठोस काहीच नाही…

May 24, 2010 7:22 AM0 commentsViews: 1

24 मे

यूपीएच्या वर्षपूर्तीनिमित्त घेतलेल्या पत्रकार परिषदेत पंतप्रधानांनी आज कोणताही नवा मुद्दा किंवा ठोस निर्णय जाहीर केला नाही. त्यामुळे या निमित्ताने यूपीएच्या संथ 'सरकारी' कारभाचाच पुन्हा एकदा अनुभव आला आहे.

महागाई, नक्षलवाद, काश्मिर मुद्दा, शेती, आर्थिक उदारीकरण अशा अनेक मुद्द्यांवर सरकार अपयशी ठरले आहे. पण याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना पंतप्रधानांनी कोणतेही नवे उत्तर दिले नाही. किंवा नवी घोषणाही केली नाही.

दुष्काळ, इंधनवाढ यामुळे महागाई वाढल्याचे त्यांनी सांगितले. ही महागाई डिसेंबरपर्यंत आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करू असे जुनेच आश्वासन त्यांनी पुन्हा एकदा दिले.

पाकशी तसेच जम्मू-काश्मीरमधील सर्व बंडखोर गटांशी चर्चा करण्याची नेहमीचीच तयारी पंतप्रधानांनी आज पुन्हा एकदा दाखवली.

भ्रष्टाचारी तसेच अकार्यक्षम मंत्र्यांनाही पाठीशी घालण्याची पंतप्रधानांची भूमिका या पत्रकार परिषदेत पाहायला मिळाली.

राहुल गांधी मंत्रिपदासाठी उत्सुक नसल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

close