11 जुलैच्या बॉम्बस्फोटांची सुनावणी 14पासून

May 24, 2010 7:56 AM0 commentsViews: 4

24 मे

मुंबईत 11 जुलै 2006 रोजी झालेल्या रेल्वे बॉम्बस्फोटांच्या खटल्याची सुनावणी 14 जूनपासून सुरू होणार आहे.

या दिवशी लोकलमध्ये सात बॉम्बस्फोट झाले होते. एटीएसने याप्रकरणी 13 जणांना अटक केली आहे.

गेल्या चार वर्षांपासून बॉम्बस्फोटाच्या खटल्याला स्थगिती देण्यात आली होती.

पण ही स्थगिती सुप्रीम कोर्टाने उठवल्यानंतर आज याबाबत कोर्टात सुनावणी झाली.

आता या खटल्याचे कामकाज येत्या 14 जूनपासून सुरू होणार आहे.

close