टाटा सन्सच्या अध्यक्षपदी टीएसीएसचे एन. चंद्रशेखरन

January 12, 2017 8:39 PM0 commentsViews:

tcs-chandrasekaran_660_021115014806_060815074226

12 जानेवारी :  सायरस मिस्त्री यांच्या वादग्रस्त हकालपट्टीनंतर आता टाटा सन्सच्या अध्यक्षपदी यापुढे एन. चंद्रशेखरन यांची निवड करण्यात आली आहे. मिस्त्री यांना हटवल्यानंतर तात्पुरत्या काळासाठी स्वत: रतन टाटा यांनी टाटा सन्सच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेतली होती. अखेर तीन महिन्यातच नव्या अध्यक्षांची घोषणा करण्यात आली आहे.

एन. चंद्रशेखरन हे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे (TCS) सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. टाटा ग्रुपमधील सर्वात तरुण सीईओ म्हणूनही एन. चंद्रशेखर यांच्याकडे पाहिलं जातं. सायरस मिस्त्री यांना अध्यक्षपदावरुन हटवल्यानंतर एन. चंद्रशेखरन यांना ‘टाटा’च्या संचालक मंडळात घेण्यात आलं होतं.

एन. चंद्रशेखरन टीसीएसमध्ये 2009पासून मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. त्यानंतर आता टाटा सन्सच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे. एन. चंद्रशेखरन यांच्या कार्यकाळात टीसीएसची चांगली प्रगती झाल्याने टाटा सन्सचं अध्यक्षपद त्याच कामाची पावती असल्याचंही बोललं जात आहे. विशेष म्हणजे ‘टाटा’च्या 15वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच बिगर-पारशी व्यक्ती निवडण्यात आली आहे.

दरम्यान, एन. चंद्रशेखरन यांच्या नियुक्तीमुळे रिक्त होणाऱ्या टीसीएसच्या सीईओपदी राजेश गोपीनाथन यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


 

close