नाशिक पोलिसांची गांधीगिरी, विनाहेल्मेटवल्यांना भविष्य ऐकण्याची शिक्षा

January 12, 2017 6:18 PM0 commentsViews:

प्रशांत बाग, नाशिक
12 जानेवारी : विनाहेल्मेट बाईकस्वारांवर नेहमीच पोलीस कारवाई होतेय. मात्र नाशिक पोलिसांनी विनाहेल्मेट बाईक चालवणाऱ्यांवर एक वेगळ्या प्रकारची कारवाई केलीये. ही कारवाई कशी आहे ते तुम्ही पाहाच.

Helmet21212
नाशिकमध्ये वाहतूक पोलिसांनी ज्योतिषाचं दुकान मांडलं आहे. ते भविष्यही सांगताय आहे. थोडी जबरदस्ती आहे. जे बाईकस्वार हेल्मेट घालत नाही अशा बाईकस्वारांसाठी हे ज्योतिषाचं दुकान थाटण्यात आलं आहे. आता तुम्ही म्हणाल पोलीस हे काय करायला लागलेत. पण हे खरं आहे. कारण जे बाईकस्वार हेल्मेट घालत नाहीत अशा बाईकस्वारांना वाहतूक पोलीस जबरदस्तीनं भविष्य सांगतायेत. भविष्याच्या चिठ्ठ्या ते तुम्हालाच उचलायला लावतात. आणि भविष्य वाचूनही दाखवायला लावतात.

नाशिक पोलिसांनी हेल्मेट न घालणाऱ्या बाईकस्वारांसाठी अनोख्या पद्धतीनं जनजागृती सुरु केली आहे. वाहतूक पोलीस विनाहेल्मेट बाईकस्वारांना गुलाब-पुष्पही देतायेत. देवभूमी असलेल्या नाशकात लोकांची देवावर श्रद्धा आहे. त्यामुळं किमान पोलिसांची भूतभविष्याची ही मात्रा बाईकस्वारांवर लागू पडेल ही अपेक्षा आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close