मुंबईतील मानखुर्दच्या झोपडपट्टीत भीषण अग्नितांडव; दोनजण जखमी

January 12, 2017 9:44 PM0 commentsViews:

12 जानेवारी :   मुंबईत मानखुर्दच्या मंडाळा झोपडपट्टीत आज (गुरूवारी) संध्याकाळी सहाच्या सुमारास भीषण आग लागली. गेल्या 2 तासापासून ही आग धुमसतच आहे. या आगीत आतापर्यंत दोन जण जखमी झाल्याची महिती आहे. आगीचे रौद्ररूप पाहता परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे.

या भागात असलेल्या कुर्ला स्क्रॅप असोसिएशनमध्ये तेलाचे गोदाम होते.  या गोदामाला आधी आग लागली, आणि त्यानंतर ही आग  बाजूच्या रद्दीच्या गोदामात पसरली. याची माहिती मिळताच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमनदलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

MANKHURD FIRE!

अरुंद गल्ल्या असल्याने अग्निशमनदलाच्या गाड्यांना घटनास्थळी जाण्यात अडचणी येत आहेत. यातच बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. यामुळे सायन-पनवेल मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. अग्निशामक दलाच्या गाड्याही या वाहतु कोंडीमध्ये अडकल्या आहेत. खबरदारी म्हणून प्रशासनाने परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवला आहे.

दरम्यान, या ठिकाणी काही केमिकलचेही गोदाम असल्याने यातील केमिकलचा स्फोट सुद्धा होत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close