पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलला दिमाखात सुरुवात

January 13, 2017 10:00 AM0 commentsViews:

piff

13 जानेवारी : 15व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलला पुण्यात दिमाखात सुरुवात झालीये.यंदा ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव आणि अपर्णा सेन यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलंय.तर पंडित झाकीर हुसेन यांना सचिनदेव बर्मन पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी सीमा आणि अपर्णा यांना पैठणी साड्या तर हुसेन यांना पुणेरी पगडी देऊन सन्मान करण्यात आला.सीमा देव यांनी आपली आई आणि गुरू राजा परांजपे यांच्यामुळेच इथवर पोहोचल्याची भावना व्यक्त केली. तर अपर्णा सेन यांनी पुणेकरांनी केलेल्या या सन्मानाबद्दल आभार मानत आपला पुरस्कार दिवंगत अभिनेते ओम पुरी यांना समर्पित केला.झाकीर हुसैन यांनी सचिन देव बर्मन यांच्या नावाने पुरस्कार दिल्याबद्दल पुणेकरांचे आभार मानले.

19 जानेवारीपर्यंत पिफमध्ये देशी-विदेशी विविध सिनेमांचा आस्वाद घेता येईल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close