आशिष शेलार राष्ट्रवादीकडून लक्ष्य

January 13, 2017 10:15 AM0 commentsViews:

shelar

13 जानेवारी : महानगरपालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं आणि राजकीय नेत्यांची आरोपबाजी सुरू झाली. सुधार समितीचे अध्यक्षपद कायम भाजपकडे राहिलं असून, मुंबईतील अनेक भूखंडांची आरक्षणं समितीने बदलली आहेत.भाजपने महापालिकेत २ लाख कोटींचा भूखंड घोटाळा केला असून आशिष शेलार हे यामागचे सूत्रधार असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला.

नगरसेवक असताना शेलार यांनी सुधार समिती कधीही सोडली नाही.काही दिवसांपूर्वी आशिष शेलार यांच्या वांद्रे मतदारसंघात एल्को मार्केटसमोरचा हिल रोड येथील भूखंड आरक्षणमुक्त करण्यात आला.तर राष्ट्रवादीच्या या उलट्या बोंबा असल्याचा प्रत्यारोप भाजपने केलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close