पुणे स्फोटातील संशयीत आरोपीला अटक

May 24, 2010 8:47 AM0 commentsViews: 6

24 मे

पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील संशयीत आरोपी अब्दुल समद याला मेंगलोर विमानतळावर अटक करण्यात आली आहे.

मुंबई एटीएसने ही कारवाई केली आहे. अब्दुलला मुंबईत आणण्यात आले आहे.

अब्दुल गँगस्टर छोटा शकीलचा साथीदार आहे.

26/11च्या हल्ल्यातही अब्दुलचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. तो रियाझ भटकलच्या जवळचा मानला जातो.

बेंगळुरूजवळच्या भटकल येथे राहणारा अब्दुल बांधकाम व्यावसायिक आहे.

close