भाजपकडून शिवसेनेला युतीचा प्रस्ताव पण निर्णय संक्रांतीनंतरच

January 13, 2017 4:34 PM0 commentsViews:

13 जानेवारी :मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून युतीसंदर्भात अधिकृत प्रस्ताव आलाय, असं शिवसेनेचे खासदार अनिल देसाईंनी म्हटलंय. पण सेना-भाजप युतीबद्दलची बोलणी आता संक्रांतीनंतरच होणार आहेत.

मुंबई महापालिका निवडणुकीबाबत शिवसेनाभवनात एक बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेचे आमदार सहभागी झाले होते. यात युतीवर संक्रांतींनतर चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. शिवसेना आणि भाजपच्या गोटात युतीबद्दल जोरदार खलबतं सुरू आहेत.

uddhav-and-devendra

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप – शिवसेना युती होणार की नाही याबद्दलचा निर्णय अजून झालेला नाही. भाजप नेत्यांसोबत संक्रांतीनंतर युतीबद्दल चर्चा करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतलाय. त्यामुळे आता भाजप- शिवसेनेची युती होणार की युतीवरच संक्रांत येणार याची जोरात चर्चा रंगलीय.

मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसला फायदा होऊ नये म्हणून युती करावी, अशी भूमिका मुख्यमंत्र्यानी गुरुवारी झालेल्या बैठकीत मांडली. या बैठकीत स्थानिक पातळीवर युतीची चर्चा सुरू करण्याचे आदेश दिले गेले. जिल्हा परिषद, पंचायत समिती ,महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री, जिल्हाध्यक्ष ,आणि संघटन मंत्री यांची बैठक गुरुवारी रात्री 2 वाजेपर्यंत वर्षावर बैठक चालली.

युती करताना फक्त 2012च्या निवडणुकीच्या फॉर्म्युलानुसार नाही तर 2014च्या विधानसभा निवडणुकीत भाजपची जी ताकद वाढली त्या आधारावर जागा वाटप व्हावं असा आग्रह भाजपनं धरलाय.

महापालिका निवडणुकांची घोषणा होताच शिवसेना आणि भाजपचे नेते एकमेकांवर उघडपणे टीका करताना दिसतायत. आता तर थेट सामानामधून भाजपवर टीका करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकांची रणधुमाळी जोरात सुरू झालीय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close