मी ‘सिंगल’ राहणंच पसंत करेन ! ‘जियाजिया’ रोबो

January 13, 2017 5:40 PM0 commentsViews:

china beautiful robot
13 जानेवारी :  चीनच्या रोबो रिसेप्शनिस्टनी याआधीच जगाचं लक्ष वेधून घेतलंय. पण आता चीनने सगळ्यात मानवी वाटणारी अशी ‘जियाजिया’ रोबो सगळ्यांसमोर आणलीय. ही सुंदर रोबो तरुणी अगदी गोड आवाजात संवाद साधते. काही सोप्या प्रश्नांची उत्तरं देते आणि तुम्हाला कॉम्प्लिमेंट्सही देते. ‘यू आर अ हँडसम मॅन’ असं ती एकाला म्हणाली. तुला बॉयफ्रेंड आहे का ? असं तिला विचारलं तेव्हा ती चतुरपणे म्हणाली… मी ‘सिंगल’ राहणंच पसंत करेन !

लास व्हेगासमध्ये झालेल्या इलेक्ट्रॉनिक शो मध्ये या पहिल्यावहिल्या मानवी रोबोला जोरदार पसंती मिळाली. रोबोंमध्ये अशा प्रकारे तांत्रिक बुद्धिमत्ता विकसित केली तर हे रोबो सेवाक्षेत्रामध्ये काम करू शकतात, असा तंत्रज्ञांना विश्वास आहे. हे रोबो दुसऱ्यांशी संवाद साधू शकतात. त्यामुळे दुकानं, हॉटेल्स अशा ठिकाणी त्यांची मदत होऊ शकते. त्यांचं काम रिमोट कंट्रोलवरही चालू शकतं. शिवाय इंटरनेटचा वापर करून हे रोबो आवश्यक ती माहितीही देऊ शकतात.

चीनने विकसित केलेली ही रोबो चेहऱ्यावर आपल्यासारख्या भावभावनाही दाखवू शकते. त्यामुळे तिच्याशी काही वेळ संवाद साधणंही शक्य होतं. ‘जियाजिया’ सारख्या रोबो अशा प्रकारे २४ तासही काम करू शकतात. त्यामुळे झपाट्याने होणाऱ्या उद्योग आणि सेवाक्षेत्रात अशा रोबोंची खूप मदत होणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close