औरंगाबादच्या महापौरांना बछड्यांना कुरवाळणं पडलं महागात !

January 13, 2017 7:04 PM0 commentsViews:

 सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद

13 जानेवारी :  वाघाच्या बछड्यांसोबत फोटोसेशन केल्यानं औरंगाबादचे महापौर बापू घडामोडेंच्या आयुष्यात मोठ्या घडामोठी होण्याची शक्यता आहे. कारण वाघाच्या बछड्यांसोबतचं फोटोसेशन हे वादात सापडलं असून महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांवर कारवाईची शक्यता वर्तवण्यात येतं आहे.

Aur_bachda1

औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानातल्या बछड्यांच्या नामकरणावेळी बापू घडामोडे आणि स्थायी समिती सभापती मोहन मेघावाले हे वाघाच्या बछड्यांच्या नामकरण सोहळ्याला आले होते. यावेळी दोघांनीही बछड्यांना कुरवाळले शिवाय त्यांच्यासोबत फोटोसेशनही केलं. वन्यप्राण्यांना हाताळणं आणि त्यांच्यासोबत फोटोसेशन करणं हा गुन्हा आहे. पण हा गुन्हा आहे, हे त्यांच्या ध्यानी मनीही नव्हतं. आणि जेव्हा हे समजलं तेव्हा खूप उशीर झाला होता.

केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरण कायद्यानुसार दोघांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. महापालिका आयुक्त ओमप्रकाश बखोरीया यांनीही या प्रकरणी कारवाई करणार असल्याचं सांगितलंय.

वनकायदा माहित नसल्यानं ही नसती आफत महापौरांनी स्वतःवर ओढवून घेतलीये. आता कारवाई होणार या कल्पनेनंचं महापौरांचं धाबं दणाणलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close