मुंबईतला 13 जानेवारीचा सनबर्न फेस्टिवल रद्द

January 13, 2017 9:31 PM0 commentsViews:

Sunburn Festival

13 जानेवारी : बंगळुरूप्रमाणेच मुंबईतही सनबर्न फेस्टिवल अडचणीत सापडला आहे. मुंबईमध्ये 13 जानेवारीला महालक्ष्मी रेसकोर्सवर हा फेस्टिवल होणार होता. आता हा फेस्टिवल बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये रिलायन्स जिओ गार्डनमध्ये परिसरात होणार आहे. मुंबई महापालिकेने या फेस्टिवलसाठी रेसकोर्सचा वापर करायला परवानगी नाकारलीय. या शोसाठीची तिकिटं खरेदी करू नका, असं आवाहन मुंबई महापालिकेने केलं होतं.

सनबर्न फेस्टिवलच्या प्रेस रिलीजनुसार 13 जानेवारीला संध्याकाळी हा फेस्टिवल होणार होता. यामध्ये डीजे डेव्हिड ग्वाटा परफॉर्म करणार होता. पण आता या फेस्टिवलचं ठिकाणच बदलण्यात आलंय. त्यामुळे सनबर्न फेस्टिवलच्या चाहत्यांची निराशा झालीय. महालक्ष्मी रेसकोर्ससाठी नोव्हेंबर 2016 मध्ये आयोजकांनी 10 लाख रुपये भरले नाहीत, असं महापालिकेने म्हटलंय.

बंगळुरूमध्येही गुरुवारी म्हणजे 12 जानेवारीला सनबर्न फेस्टिवल होणार होता. पण न्यू इयर पार्टीत झालेल्या गैरप्रकारामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आणि सनबर्न फेस्टिवल रद्द करण्यात आला. बंगळुरू, मुंबई, हैदराबाद आणि नवी दिल्ली या शहरांमध्ये सनबर्न फेस्टिवल आयोजित करण्यात येणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close