‘#करूनदाखव’लं नंतर आता सेनेचं ‘#डिडयूनो?’

January 14, 2017 2:07 PM0 commentsViews:

Didyounow

14 जानेवारी :  महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजताच मुंबईत आता पोस्टरबाजीची सुरुवात झाली आहे. यात महत्वाची गोष्ट म्हणजे शिवसेनेच्या ‘#करुनदाखवलं’ या टॅगलाईनऐवजी आता ‘#डीड यू नो’ अशी नवी टॅगलाईन सेनेच्या पोस्टरवर झळकताना दिसत आहे.

तरुणांना आकर्षित करण्यासाठी ‘डीड यू नो’ अर्थात तुम्हाला माहिती आहे का, अशी नवी टॅगलाईन सेनेच्या पोस्टरवर झळकताना दिसत आहे. ‘#करुनदाखवलं’ ही शिवसेनेची टॅगलाईन याआधी बऱ्याच चर्चेत सुद्धा राहिली होती. पण पालिकेच्या विविध विकासकामांची माहिती देणाऱ्या शिवसेनेनं आता आपली टॅगलाईन बदलली आहे. मुंबईभर ‘#डीड यू नो’ नावाची मराठी आणि इंग्रजीत शिवसेनेच्या जाहिराती झळकत आहे. इंटरनेटवर डिड यू नो या शिर्षकाखाली इंटरेस्टिंग माहिती असते. त्याच धर्तीवर हा मार्केटिंग कॅम्पेन आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close