तरुणाची पोलीस स्टेशनमध्ये आत्महत्या

May 24, 2010 11:00 AM0 commentsViews: 3

24 मे

सोलापुरात अक्कलकोटमधील हुन्नर इथे एका तरुणाने पोलीस स्टेशनमध्ये आत्महत्या केली आहे.

विठ्ठल कोळेकर असे या तरुणाचे नाव आहे.

पोलीस स्टेशनमध्ये स्वतःच्या पँटने गळफास लावून त्याने आत्महत्या केली. घरगुती वादातून त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

घरातील एका लग्नात सासरच्यांशी त्याची वादावादी झाली होती. त्यानंतर त्याच्या बायकोनेच त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीवरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. काल रात्री दहा साडेदहाच्या सुमारास त्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. याप्रकरणी तपास सुरू आहे.

close