मुंबईला धुळ चारत गुजरात पहिल्यांदाच बनला रणजी चॅम्पियन

January 14, 2017 6:18 PM0 commentsViews:

parthiv_2911ap_87514 जानेवारी :  तब्बल 41 वेळा रणजी करंडक जिंकलेल्या मुंबईला अंतिम सामन्यात पराभूत करून गुजरातनं रणजी करंडक पटकावला आहे. गुजरात संघाचा कर्णधार पार्थिव पटेलच्या शतकी खेळी करत गुजराला पहिल्यांदाच रणजी करंडक जिंकून दिला आहे.

पहिल्या डावात मुंबईने पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव यांच्या अर्धशतकांच्या बळावर 228 अशा रन्स केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना पार्थिव पटेल आणि मनप्रित जुनेजा यांच्या दमदार अर्धशतकांमुळे गुजरातने 328 रन्स केले. पहिल्या डावात गुजरातला 100 रन्सची आघाडी मिळाली होती. मात्र, दुसऱ्या डावात मुंबईने  411रन्सचा डोंगर उभारला. श्रेयस अय्यर, आदित्य तारे आणि अभिषेक नायर यांनी जबाबदार अर्धशतके ठोकली. त्यामुळे मुंबईने गुजरातसमोर विजयासाठी 312 धावांचं आव्हान ठेवलं.

आज सकाळी सामना सुरू झाला तेव्हा गुजरातची सुरुवात फार चांगली झाली नव्हती. 100 रन्सच्या आत 3 विकेट्स गेल्याने मुंबई विजेतेपदावर शिक्कामोर्तब करेल असं वाटत होतं. पण  पार्थिव पटेलनं संयमी आणि आक्रमक फलंदाजीचं दर्शन घडवत संघाला रणजी करंडक जिंकून दिला.

दरम्यान, गुजरातच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या पार्थिव पटेलला यावेळी ‘मॅन ऑफ दि मॅच’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यापूर्वी १९५०-५१ मध्ये गुजरात रणजी करंडकाच्या अंतिम सामन्यात पोहचला होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close