गावकर्‍यांनी रोखल्या कचर्‍याच्या गाड्या

May 24, 2010 11:18 AM0 commentsViews: 8

24 मे

आगीमुळे पसरलेल्या धुराने संतप्त झालेल्या उरूळी देवाची आणि फुरसुंगी गावातील गावकर्‍यांनी आमदार विजय शिवतारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केले आहे.

कचर्‍याची एकही गाडी त्यांनी या परिसरात येऊ दिली नाही.

या पार्श्वभूमीवर पुण्याचे महापौर मोहनसिंग राजपाल यांनी उरळी कचरा डेपोला भेट देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती या गावकर्‍यांना केली.

कोणत्याही परिस्थितीत 31 तारखेपासून या डेपोमध्ये ओपन डंपिंग केले जाणार नसल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

close