भाजपने पाळला काळा दिवस

May 24, 2010 11:23 AM0 commentsViews: 6

24 मे

केंद्रातल्या यूपीए सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र सरकारची कामगिरी असामाधानकारक आहे, असे सांगत प्रमुख विरोधी पक्ष भाजपने आजचा दिवस काळा दिवस म्हणून जाहीर केला.

आज भाजपकडून ठिकठिकाणी निदर्शने करण्यात येत आहेत. विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, अरुण जेटली यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत जंतरमंतर इथे निदर्शने करण्यात आली.

महागाई, वाढते नक्षलवादी हल्ले ही आव्हाने केंद्र सरकारसमोर आहेत. पण याकडे केंद्र सरकार गांभीर्याने बघत नाही, असा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला आहे

close