नालेसफाई अर्धवटच

May 24, 2010 11:30 AM0 commentsViews: 26

गोविंद तुपे, मुंबई

24 मे

पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पण मुंबई आणि मुंबईतील नाले मात्र त्यासाठी सज्ज झालेले दिसत नाहीत.

महापालिकेचे अधिकारी मात्र नालेसफाई झाल्याचे ठासून सांगत आहेत.

नाला रूंदीकरणाची अनेक कामे रखडलेली आहेत. पण महापालिका मात्र 71 टक्के नाल्यांची सफाई झाल्याचे सांगत आहे.

मुंबईत जवळपास 300हून अधिक लहान मोठे नाले आहेत. त्यातही बराच भाग सखल असल्याने थोडा जरी पाऊस पडला, तरी हा भाग लगेच पाण्याखाली जातो.

हिंदमाता, मीलन सबवे, किंग्ज सर्कल ब्रीज, कस्तुरबा हॉस्पिटलसमोरचा भाग, कुर्ला, मिठी नदीच्या आसपासचा परिसर, साकीनाका यांसारख्या सखल भागांत मोठ्या प्रमाणात पाणी भरते. दरवर्षी हा प्रकार घडतो. पण सुधारणा मात्र होतच नाहीत.

रेल्वे, पीडब्ल्यूडी यांच्या हद्दीतील नालेसफाईदेखील अजून झालेली नाही. याशिवाय बर्‍याच नाल्यांत अनाधिकृत झोपड्या ऊभ्या राहिल्यात. त्यामुळे नाल्यांची रूंदी कमी झाली आहे.

ज्या नाल्यांमधील गाळ काढला गेला तो उचललाच गेला नाही. त्यामुळे पहिल्याच पावसात हा गाळ पुन्हा नाल्यात जाणार हे स्पष्टच दिसत आहे.

असे चित्र असतानाही मुंबई महापालिका मात्र सगळे काही आलबेल असल्याचे दावे करण्यातच मग्न आहे.

close