उष्माघाताचे 4 दिवसांत 26 बळी

May 24, 2010 12:19 PM0 commentsViews: 33

24 मे

जळगाव जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांत उष्माघाताने बळी गेलेल्यांची संख्या 26 झाली आहे. जिल्ह्यातील फैजपूर इथे तब्बल 49.4 अंश सेल्सियस एवढ्या विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे.

फैजपूरच्या मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या तापमापक यंत्रावर हे तापमान नोंदवले गेले आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमान वाढल्याने प्रचंड उष्मा आणि घामाने नागरिक हैराण झालेत.

जिल्ह्यातील जवळपास सर्व तालुक्यांतील सरकारी दवाखान्यामध्ये उष्माघाताच्या पेशंटची गर्दी दिसत आहे. यात भर म्हणून लोडशेडिंगने नागरिक हैराण झाले आहेत.

तर या उन्हाचा फटका शेतीलाही बसला आहे. जिल्हा प्रशासनाने पाणीसाठा केवळ पिण्यासाठी राखीव ठेवला आहे.

close