मुंबईला डॉप्लर रडारच नाही

May 24, 2010 12:39 PM0 commentsViews: 11

24 मे

पावसाळा जवळ आला आहे. मुंबईत 26 जुलैसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी सर्वच यंत्रणा तयारीला लागल्या आहेत.

26 जुलै 2005 ला मुंबईत झालेल्या मुसळधार पावसानंतर हवामानाचा अचूक अंदाज वर्तवण्यासाठी डॉप्लर रडार बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

पण पाच वर्षानंतरही मुंबईला डॉप्लर रडार मिळालेले नाही.

नौदलाने चीनी रडार बसवण्यास विरोध केल्याने गेल्या वर्षी आलेले रडार दिल्लीला परत पाठवण्यात आले. तर आता भेलने तयार केलेले रडारही गेल्या दीड महिन्यांपासून कुलाब्याच्या हवामान विभागाच्या ऑफिसमध्ये पडून आहे.

हे रडार बसवण्यास किमान महिनाभराचा कालावधी लागतो. पण पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपल्यानंतरही हवामान विभागाने हे डॉप्लर रडार बसवलेले नाही.

त्यामुळे पाच वर्षांपूर्वी मुंबईत उडालेल्या हाह:कारानंतरही हवामान विभाग आणि सरकारला जाग आलेली दिसत नाही.

close