सोलापुरात संगीताच्या बळावर सुधारली शेतीची उत्पादकता

October 19, 2008 2:07 PM0 commentsViews: 6

19 ऑक्टोबर, सोलापूर आपल्या जीवनात संगीताचं खूप महत्त्व आहे. पक्षी, प्राणी यांनाही संगीत आवडतं असल्याचं सिध्द झालं आहे. संगीताच्या आधारे असाध्य मानवी रोगावरही उपचार केले जातात. मात्र सोलापूरमधल्या एका प्रगतीशील शेतक-याने संगीताचा उपयोग आपल्या शेतीसाठी केला आहे. इथल्या पिकांना ऐकवली जातायत मराठी भक्ती आणि भावगीतं. आणि त्या जोरावर शेतीची उत्पादकतासुधारली गेली आहे. त्या शेतक-याचं नाव आहे शिवाजी बोडके.

close