टॉपर्सची यादी जाहीर होणार नाही

May 24, 2010 1:53 PM0 commentsViews: 4

24 मे

बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. सरकारने मेरीट लिस्ट यापूर्वीच बंद केली आहे. पण या वर्षापासून राज्यात पहिल्या, दुसर्‍या क्रमांकावर येणार्‍या टॉपर्सची म्हणजे गुणवंतांची यादीही जाहीर होणार नाही.

शालेय शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली. पण विविध विषयांतील टॉपर्सना देण्यात येणारी बक्षिसे कायम ठेवणार असल्याचे थोरात यांनी नमूद केले.

बारावीचा निकाल http://maharesult.nic.in, www.msbshse.ac.in, www.maharesult.nic.in, MKCL च्या MSCIT केंद्रामधूनही हा निकाल मिळू शकेल.

close