रुचिका प्रकरणी राठोडला शिक्षा

May 25, 2010 8:56 AM0 commentsViews: 1

25 मे

अखेर रुचिका गिरहोत्रा प्रकरणी एसपीएस राठोड याला दीड वर्षांची शिक्षा झाली आहे.

चंदीगड सेशन कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे.

यानंतर राठोडला ताब्यात घेण्यात आले असून त्याची थेट बुडेल जेलमध्ये रवानगी करण्यात येणार आहे.

या प्रकरणी राठोडला सेशन कोर्टाने 6 महिन्यांची शिक्षा दिली होती. रुचिकाच्या कुटुंबियांनी आणि सीबीआयने त्याविरोधात अपिल केले होते. त्यावर निकाल देताना कोर्टाने ही शिक्षा दिली.

राठोडचे वय आणि आजार लक्षात घेऊन दोन वर्षांऐवजी कोर्टाने दीड वर्षांची शिक्षा सुनावली.

परंतू दोन वर्षांचीच शिक्षा मिळावी म्हणून पुन्हा अपिल करण्याचे रुचिकाच्या वकिलांनी स्पष्ट केले आहे.

यानंतर राठोड हायकोर्टात अपिल करण्याची शक्यता आहे.

close