सुरेश रैनाचे नेतृत्व

May 25, 2010 9:08 AM0 commentsViews: 7

25 मे

झिम्बाब्वे दौर्‍यातील ट्राय सिरीजसाठी भारतीय टीम आज रवाना होणार आहे. कॅप्टन सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली भारतीय टीम या दौर्‍यात खेळणार आहे.

टी-20 वर्ल्ड कपमधील भारतीय टीमच्या फ्लॉप कामगिरीनंतर सीनिअर खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय निवड समितीने घेतला होता.

महेंद्रसिंग धोणी, गौतम गंभीर, विरेंद्र सेहवाग, झहीर खान, आशिष नेहरा, हरभजन सिंग, युवराज सिंग आणि प्रविण कुमार या सर्व खेळाडूंना निवड समितीने विश्रांती दिली आहे.

त्यामुळे धोणीऐवजी सुरेश रैना याची कॅप्टनपदी निवड करण्यात आली होती. या दौर्‍यासाठी विराट कोहलीची व्हाईस कॅप्टन म्हणून निवड करण्यात आली.

तर फास्ट बॉलर पंकज सिंग आणि अशोक दिंडा, विकेटकिपर नमन ओझा, तसेच स्पिन बॉलर आर. आश्विन या तरुण खेळाडूंचा या टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.

close