अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला

May 25, 2010 9:38 AM0 commentsViews: 1

25 मे

मंगलोरमध्ये अपघात झालेल्या विमानाचा ब्लॅक बॉक्स अखेर सापडला आहे. जवळपास 72 तासांच्या शोधानंतर अपघात स्थळाच्या ढिगार्‍यातून हा ब्लॅक बॉक्स शोधून काढण्यात यश मिळाले.

ब्लॅक बॉक्सचा मूळ रंग नारिंगी आहे. पण अपघातानंतर त्याचा रंग पूर्णपणे बदलून गेला आहे. तो काळा दिसत आहे.

डीजीसीएने ब्लॅक बॉक्स मिळाल्याचे अधिकृतरित्या जाहीर केले आहे.

हा बॉक्स विमानाच्या पाठीमागच्या भागात बसवलेला असतो.

अपघाताच्या वेळी नेमके काय झाले होते, याचा शोध आता या ब्लॅक बॉक्सच्या सहाय्याने डीजीसीए उलगडणार आहे.

close