उष्माबळींची संख्या 35 वर

May 25, 2010 9:50 AM0 commentsViews: 7

25 मे

जळगाव जिल्ह्यात उष्माघाताचा कहर सुरुच आहे. काल दिवसभरात उष्माघाताचे आणखी 9 बळी गेले आहेत.

जळगाव जिल्ह्यात गेल्या 5 दिवसांत बळींची संख्या 35 वर गेली आहे.

तर शेतीलाही या कोरड्या कडक उन्हाचा मोठा फटका बसला आहे.जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील पाणीसाठा हा फक्त पिण्यासाठी राखीव ठेवला आहे. त्यामुळे शेतीला होणारा पाणी पुरवठा बंद झाला आहे.

वाढते तापमान आणि लोडशेडिंग यामुळे जळगावकर हैराण झाले आहेत. जिल्ह्यातील फैजपूर इथे तब्बल 49.4 अंश सेल्सियस एवढ्या विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे.

close