रेंगाळलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे कोल्हापूरकर त्रस्त

May 25, 2010 3:17 PM0 commentsViews: 3

25 मे

कोल्हापूर शहरात 220 कोटींचे रस्ते होत आहेत. पण या रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने कोल्हापूरकरांना त्रास सहन करावा लागत आहे.

कोल्हापूर शहराचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी रस्ते विकास प्रकल्पाअंतर्गत 49 किलोमीटरचे रस्ते बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा, या तत्वानुसार होत आहेत.

9 जानेवारी 2009 पासून या रस्त्यांचे काम सुरू आहे. काम होऊन दीड वर्ष उलटले तरीही 26 किलोमीटर रस्त्याचा पत्ताच नाही.

त्यात संबधीत आयआरबी कंपनी आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्यात तळमेळ नसल्याने सगळीकडचे रस्ते एकाच वेळी खणून ठेवले गेले आहेत.

त्यामुळे वाहनचालकांतून संताप व्यक्त होत आहे. पावसाळा तोंडावर आला असतानाही कामाच्या गतीत वाढ झालेली नाही.

close