‘बिग बाजार’समोर सेनेचे आंदोलन

May 25, 2010 5:18 PM0 commentsViews: 22

25 मे

'बिग बाजार'च्या कामगारांसाठी शिवसेनेने आज बिग बाझार व्यवस्थापनाच्या विरोधात आंदोलन केले.

मुंबईतील जोगेश्वरी येथे असलेल्या बिग बाजारच्या मुख्य ऑफिससमोर शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेने जोरदार घोषणाबाजी केली.

कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक आणि शिवसेनेचे स्थानिक आमदार रवींद्र वायकर यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने व्यवस्थापनाशी कामगारांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा केली.

पगारवाढ, कामगारांच्या अधिकृत युनियनला मान्यता आणि कामावरून काढून टाकलेल्या 28 कामगारांना परत घ्यावे, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.

या मोर्चात बिग बाजारचे कामगारही सामील झाले होते. आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा शिवसेनेने केला आहे.

close