आयकॉनिक टॉवरसाठी साडेचार हजारांचे टेंडर

May 25, 2010 5:26 PM0 commentsViews: 1

25 मे

मुंबईच्या वैभवात भर घालणार्‍या एमएमआरडीच्या आयकॉनिक टॉवरच्या बांधकामासाठीचे टेंडर तब्बल 4 हजार 53 कोटी रुपयांना विकले गेले आहे.

लोढा क्राऊन बिल्डमार्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने हे टेंडर विकत घेतले आहे. मुंबईतील ही सगळ्यात उंच इमारत वडाळा इथे बांधली जाणार आहे.

या इमारतीच्या टेंडरसाठी प्रति स्क्वेअर मीटरला 40 हजार रुपये भाव एमएमआरडीने लावला होता. पण लोढा काऊन बिल्डमार्टने दुप्पट दराने म्हणजे 81 हजार 818 रुपये प्रति स्क्वेअर मीटर दराने हे टेंडर घेतले आहे.

यातून एमएमआरडीएला तब्बल 4 हजार 53 कोटी रुपयांची घसघशीत कमाई झाली आहे. या इमारतीमध्ये एकूण 50 लाख चौरस फूट जागा उपलब्ध होणार आहे.

तसेच या इमारतीत ऊर्जा बचत योजना राबवली जाणार आहे. यात पाण्याचा पुनर्वापर केला जाणार आहे. तर एसीमधून निर्माण होणार्‍या उष्णतेचाही पुनर्वापर केला जाणार आहे.

close