एअर इंडियाचे 14 हजार कर्मचारी संपावर

May 25, 2010 5:31 PM0 commentsViews: 6

25 मे

एअर इंडियाचे 14 हजार पेक्षा जास्त कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे एअर इंडियाच्या जवळपास 30 टक्के फ्लाइट्स रद्द झाल्या आहेत.

मंगलोर विमान अपघातानंतर काही इंजीनियर्सनी मीडियाशी संवाद साधला होता. त्यानंतर एयर इंडिया व्यवस्थापनाने या अभियंत्यांना नोटीस पाठवली होती.

मीडियाशी बोलण्यास मनाई करणार्‍या आदेशाविरोधात हा संप पुकारण्यात आला आहे. एअर इंडियाचे व्यवस्थापन आणि इंजीनिअर्सची संघटना यांच्यात बोलणी झाल्यानंतरच या संपावर काही तोडगा निघू शकेल.

उद्या दुपारी तीन वाजता दिल्लीत एअर इंडियाच्या मुख्य कार्यकारी संचालकांसोबत इंजीनिअर्सच्या संघटनेची बैठक होणार आहे.

close