हफीज सईदला सोडले निर्दोष

May 25, 2010 5:43 PM0 commentsViews: 4

25 मे

26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड हफीज सईदला पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने निर्दोष सोडले आहे. त्याच्या विरोधात कुठलेही ठोस पुरावे नसल्याने त्याला नजर कैदेत ठेवणे, योग्य नसल्याचे मत कोर्टाने व्यक्त केले आहे.

दरम्यान या प्रकरणी भारताने हफीज सईदवर कारवाई करण्यासाठी विचारणा केली होती. त्यानंतर त्याला पाकिस्तान सरकारने नजर कैदेत ठेवले होते. पण आज त्याची कुठल्याही पुराव्याअभावी कोर्टाने निर्दोष सुटका केली.

पाकिस्तानच्या भूमीचा वापर दहशत पसरवण्यासाठी होणार नाही, याची काळजी पाकिस्तानने घ्यायला हवी, अशी भूमिका भारताच्या वतीने परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिव निरुपमा राव यांनी मांडली आहे

close